सिंदखेडराजा मातृतीर्थ लाइव्ह वार्ता : राष्ट्रवादी कॉग्रेस कडुन ता 3 जुलै रोजी सिंदखेडराजा तहसिल परिसरात सकाळी ११ वा पेट्रोल गॅस व डिझेल दरवाढी चा निषेध करण्यासाठी अदोलन करण्यात आले घरगुती गॅस चे दर गेल्या वर्षात 150 ते 180 पर्यत वाढवल्यामुळे सर्वसामान्याच्या आर्थिक नियोजनाचा फार विस्कोटा झाला आहे पेट्रोल डीझेल चे दर दिवसा गणीक आभाळाला टेकले असुन यात सर्व सामान्य माणसाचे हाल होत आहे ह्या साठी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या वतीने केद्र शासनाचा निषेध करण्यात आला .
ह्या अदोलनात महिलांनी तहसील कार्यालयाबाहेर चूल पेटवून स्वयंपाक केला व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अँड नाझेर काजी यांनी गॅस सिलिंडर ला हार घालून सुरुवात केली . याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष शिवाजीराजे जाधव ,शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे , मधुकर गव्हाड सर , रमेशराव खरात ,मंगेश खुरपे ,नितीन चौधरी , शेख यासिन , विजय तायडे ,नरहरी तायडे ,अमोल भट ,आर आर शेळके ,सतीश सरोदे ,संदीप मेहेत्रे ,रमेश कोठोडे , गणेश झोरे ,अजिमभाई ,राजीव ठोके ,संजय मेहेत्रे,नितीन शेळके ,शिवाजी धोंगडे ,विलासराव देशमुख ,निखिल सरोदे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्त व सर्व सामान्य जनतेने सहभागी यांनी सहभाग घेऊन व या महागाईविरोधात घोषणा देऊन गॅस ,इंधन दरवाढीविरोधात निषेध नोंदवण्यात आला व त्यानंतर तहसील ऑफिस मध्ये निवेदन देण्यात आले .