आजी व माजी सैनिकांना मालमत्ता करामध्ये सुट सैनिकांनी लाभ घेण्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन
बुलडाणा दि.29 : जिल्ह्यातील आजी, माजी सैनिक, विधवा पत्नी, विरपत्नी, विरपिता, संरक्षण दलातील शैर्य पदक धारक यांना शासन निर्णया नुसार मालमत्ता करामध्ये सुट देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील बरेच माजी सैनिकांनी या सुटचा लाभ घेतलेला नाही, असे दिसून आले आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व आजी माजी सैनिकांनी करा बाबत सर्व सैनिकांनी एकमेकांना सूचना देण्यात यावी. ग्रामीण भागातील माजी सैनिकांना याबाबत सुचना देण्यात याव्या. आजी सैनिकांना केवळ ग्रामीण भागा मध्ये मालमत्ता करामध्ये सुट देण्यात आली आहे. या सवलतीसाठी त्यांनी युनिट मधून सर्विस करीत असले, तर प्रमाणपत्र सादर करावे. मालमत्ता करात सुट मिळणेकरीता नगरपालिका, नगर पंचायती, ग्रामपंचायती मध्ये मालमत्ता कर भरणा केलेली पावती, ओळखपत्र, आजी
सैनिकांचे सर्विस प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र तसेच घर माजी सैनिकांच्या पत्नीच्या नावाने असेल तर पी. पी. ओ. सह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात तात्काळ या संधीचा लाभ घेण्या करीता कागद पत्रासह हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.