बुलडाणा, दि.29 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2751 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2725 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 26 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपीड टेस्टमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 407 तर रॅपिड टेस्टमधील 2318 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2725 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : संग्रामपूर तालुका : निवाणा 1, पळशी 1, सोनाळा 1, काकनवाडा 1, खामगांव शहर : 4, खामगांव तालुका : जनुना 1, घाटपुरी 1, सुटाळा 1, दे. राजा तालुका : भिवगण 1, किन्ही 2, चिखली शहर : 1, चिखली तालुका : मेरा बु 1, लोणार तालुका : सावरगांव 1, भुमराळा 1, बिबी 1, पिंप्री खंडारे 1, शेगांव शहर :1, बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : रईखेड टेकाळे 1, जळगांव जामोद तालुका : बोराळा 2, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 26 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान उपजिल्हा रूग्णालय, शेगांव येथे माळीपुरा, शेगांव येथील 75 वर्षीय महिला व स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे मातला ता. बुलडाणा येथील 65 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 38 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आजपर्यंत 570221 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85879 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 85879 आहे.
आज रोजी 1513 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 570221 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86638 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 85879 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 96 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 663 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.