Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

प्रशासनाच्या आश्‍वासनानंतर आ. डॉ.रायमुलकर यांचे पेनटाकळी धरणातील पाण्यातील आंदोलन मागे.

मेहकर -: पेनटाकळी प्रकल्पाचाकालवा पाझरत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे . याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करूनही कारवाई न झाल्याने संतापलेल्या आमदार संजय रायमूलकर यांनी थेट धरणाच्या पाण्यातच आज , २१ जूनला सकाळी ११ पासून आंदोलन सुरू केले होते . सायंकाळी पाचपर्यंत आंदोलन चालले . पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी आमदार रायमूलकर यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली . दोन दिवसांत प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात येईल , असे आश्वासन त्यांनी दिले . यावेळी ‘ पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता रायमूलकरांना भेटण्यास आले होते . त्यांनीच त्यांचे बोलणे अधीक्षक अभियंत्यांशी करून दिले . महिनाभरात हा प्रश्न मार्गी न लागल्यास याहीपेक्षा तीव्र स्वरुपाचे आंदोलन शेतकरी , महिला , मुला – बाळांना घेऊन २० जून ला करू , असा इशारा रायमूलकर यांनी यावेळी दिला.

SANJAY RAYMULKAR

मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने सुमारे २७२ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान होत आहे . त्यामुळे २८ ९ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे . यासंदर्भात पालकमंत्र्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचनाही दिल्या होत्या . मात्र यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने आमदार संजय रायमूलकर यांनी आज सकाळी धरणाच्या पाण्यातच आंदोलनाला सुरुवात केली . दरवर्षी शेतकऱ्यांच्या जमिनीचे व पिकांचे मोठे नुकसान होत आहे . शेतकऱ्यांनी आणखी किती काळ आर्थिक झळ सहन करायची . आता काही झाले तरी पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारी अधिकाऱ्यांना धडा शिकविणार आहे . जोपर्यंत कालवा दुरुस्तीचा निर्णय होत नाही , तोपर्यंत पाण्यातून बाहेर येणार नसल्याचा इशारा आमदार रायमूलकर यांनी दिला होता . त्यामुळे पाटबंधारे विभागात खळबळ उडाली होती . कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने मुंबईला गेलेल्या अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा करून आंदोलनाची माहिती दिली . त्यानंतर ते स्वतःपेनटाकळी प्रकल्पावर रायमूलकरांशी चर्चा करण्यास गेले . या ठिकाणी त्यांची समजूत काढत अधीक्षक अभियंत्यांशी त्यांचे बोलणेही करून दिले . व त्यानंतर डॉक्टर आमदार संजय रायमुलकर यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.