
गजानन सोनटक्के जळगाव जा – मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता परंतु रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीने जाचक अटी लादत शेतकऱ्यांना विमा देण्यास टाळाटाळ करीत आहे व जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिकाचे पैसेवारी 50 टक्क्यांच्या आत आहे त्यामुळे विमा हा मिळालाच पाहिजेहवालदिल शेतकऱ्यानचे प्रश्न घेवून आज माजी पालकमंत्री आदरणीय डॉक्टर संजयजी कुटे साहेब हे बुलडाणा कलेक्टर कडे दाखल झाले.पीक विम्यातून रग्गड नफा कमावणाऱ्या कंपन्या आणी त्यांना पाठीशी घालणारे शासन या दोघांचे पितल उघडे पाडत न्यायासाठी लढा देणार , शेतकऱ्यांचा पीक विमा मिळवून देणार असा निर्धार त्यांनी ह्या वेळी व्यक्त केला जवळपास एक तास जिल्हाधिकारी ह्यांच्याशी चर्चा करून कश्या प्रकारे शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली हे शासनाच्या आकड्यातून सिद्ध करून दाखवले…