सोनेवाडी रवींद्र सुरूशे : चिखली तालुक्यातील सोनेवाडी गावातील सोनेवाडी ते सावरगाव डुकरे रस्त्याचं काम 2004 मध्ये माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर यांच्या हस्ते खडीकरण झालं होतं त्यानंतर किती राजकारणी आले किती गेले फक्त आश्वासन देऊन मोकळे झाले.अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. सोनेवाडी गावातील 55 टक्के शेतकऱ्यांचे जमिनी नदी पलीकडे असून नदीला पूर आल्यानंतर नदी पलीकडे राहणारे शेतकरी पुरामुळे घरी येऊ शकत नाही किंवा आपला स्वतःचा जीव धोक्यात टाकून पूर ओलांडून येतात. 2007 मध्ये याच नदीवर पूर ओलांडत असताना एक शेतकरी मरण पावला होता. तरीही प्रशासनाला जाग आली नाही.यावर्षीही लोकांना चिखल तुडवत जावे लागत असून नदीला पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांचे जनावरे चाऱ्यापासून उपाशी राहण्याची वेळ येऊ शकते. तरी संबंधित प्रशासनाने लक्ष घालून तात्काळ रस्त्याचे काम करून देण्यात यावे अशी मागणी शेतकरी व गावकऱ्यांनी केली आहे.
Related Posts