Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

बकरी ईद साध्या पध्दतीने घरीच साजरी करावी कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचना

बुलडाणा, दि.8 : कोविड 19 मुळे उभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मागील वर्षापसून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरीही धोका अद्यापही कायम आहे. त्यादृष्टीने सर्वांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्यामुळे या वर्षी 21 जुलै 2021 रोजी बकरी ईद अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करणे आवश्यक आहे. त्यानुसार शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या आहे, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.   

EID

    कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यासअनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच साजरी करावी.

सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. लागू करण्यात आलेले 4.6.2021 चे ब्रेक द चेनचे नियम आणि त्यानंतर वेळोवेळी निर्गमीत केलेल्या सुचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी दिलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे मार्गदर्शक सुचनांच्या परिपत्रकात नमूद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.