
जळगाव जामोद शहरातील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेनेचे थाली बजाव आंदोलन
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद युवा सेनेच्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदवत उपहासात्मक असे थाली बजाओ, खुशीया मनाओ आंदोलन करण्यात आले.
युवा सेना प्रमुख तथा पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री मा.ना आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सचिव मा.वरुण जी सरदेसाई यांच्या नेतृत्वात राज्यभर हे आंदोलन करण्यात आले.
युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव उपजिल्हाप्रमुख शुभम दत्तात्रय पाटील, जिल्हा समन्वयक ईश्वर वाघ नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने मुंदडा पेट्रोल पंप बऱ्हाणपूर रोड चौक येथे जोर जोरात थाळ्या वाजवून केंद्र सरकारचं अभिनंदन करत अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकीकडे महा विकास आघाडी सरकार सीएनजी गॅसचे दर कमी करू करून सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असून केंद्र सरकार मात्र महागाई वाढवून सामान्य माणसाचे कंबरडे मोडण्याचं पाप केंद्र सरकार करत आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब व तिकडच्या राज्यातील निवडणुका होईपर्यंत पेट्रोलचे दर स्थिर ठेवले अन निकाल लागतात डदररोज भाववाढ चालू ठेवली आहे. कोरोनामुळे अगोदरच संकटात असलेल्या जनतेला केंद्रातील सरकार अजून जास्त छळण्याचं काम करत आहे अशी टिका शुभम पाटील यांनी यावेळी केली.
थेट पंपावर केलेल्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा परिसरात रंगली होती.
पवन वाघ अजिक्या घाईत
पवन अवचार पवन झालटे
पवन तेलागडे शेक अनिस
सचिन वाघ शुभम पंडित
युवराज देशमुख
सह अनेक शिवसैनिक व नागरिक ही मोठ्या प्रमाणावर सहभागी होते