महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा गणेशराव पाटील यांच्या जळगाव जामोद मतदार संघात सांत्वनपर व सदिच्छा भेटी
गजानन सोनटक्के जळगाव जा – स्थानिक जळगाव जामोद शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे चिटणीस मा युनूस खान रऊफ खान यांचे अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन झाले त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी त्यांचे चिरंजीव फारूक खान युनूस खान तसेच काँग्रेस नगरसेवक तथा सेवादल जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण केदार यांच्या मातोश्री श्रीमती मथुराबाई गोविंदा केदार यांचे सुद्धा हृदयविकाराने निधन झाले त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी मा गणेशराव पाटील साहेबांनी सांत्वनपर भेटी दिल्या .
त्याचप्रमाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जळगाव जामोद नगर परिषदेचे गटनेते मा श्री अर्जुन घोलप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी पक्षनेत्या मा डॉ सौ स्वातीताई संदीप वाकेकर,प्रदेश प्रतिनिधी मा श्री रामविजयजी बुरुंगले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा श्री प्रकाश भाऊ पाटील,किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा श्री राजूभाऊ पाटील,सेवादल प्रदेश सरचिटणीस मा अच्छे खा हबिब खा पठाण,डॉ संदीप वाकेकर,माजी आरोग्य सभापती सौ अर्चना ताई घोलप, तालुका काँग्रेस कमिटी सद्यस्य सौ आरती ताई केदार,डॉ प्रशांत राजपूत,बंटी कळसकार ,मयूर राऊत,प्रमोद सपकाळ,अजय पारस्कर, प्रमोद पाटील,प्रवीण भोपळे,अजय ताठे, अकिल भाई, गौरव इंगळे,शेख जुनेद,हुसेन राही,नितीन सातव,प्रणव केदार, प्रज्वल घोलप व बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी/कार्यकर्ते उपस्थित होते