Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

बारावीचे निकाल 31 जुलै पर्यंत प्रसिद्ध करा – सुप्रीम कोर्टाकडून राज्य मंडळांना सूचना

नवी दिल्ली : कोविड (covide ) परिस्थितीत राज्य मंडळाने परिक्षा घेऊ नये या विनंतीच्या याचिकेवर सवोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने आज देशातील सर्वच राज्य मंडळांना बारावीच्या परीक्षेचे अंतर्गत मूल्यांकन निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला उद्या अकरावी परीक्षेच्या बाबत अंतिम निर्णय देण्यास बजावले आहे. याच निर्देशासोबत न्यायालयने आंध्र प्रदेश सरकारला देखील उद्याच 25 जून पर्यंत बारावीच्या परिक्षेचे धोरण जाहीर करण्याचे निर्देश दिले आहे.

SUPRIME COURT

न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. ए. एम खानविलकर यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की , प्रत्येक मंडळाला त्यांची स्वतःची योजना विकसीत करावी लागणार आहे. आजपासून दहा दिवसात ही योजना तातडीने तयार करावी. सीबीएसई आणी सीआयएससीइ साठी दिलेल्या कालावधीच्या मुदतीनुसार 31 जुलै 2021 पर्यंत अंतर्गत मूल्यांकन निकाल प्रसिद्ध करण्याचे निर्देश खंडपिठाकडून सर्व राज्य मंडळांना देण्यात आले आहे. कोविड (covide ) परिस्थितीत राज्य मंडळाने परिक्षा घेऊ नये या विनंतीच्या याचिकेवर सवोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने म्हटले की राज्य मंडळ परिक्षेबाबत एकसमान योजना लागू करता येऊ शकत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.