टंकलेखन संस्थाकडून शासन निर्णयाचे स्वागत – प्रकाश कराळे
शासनाचे सामान्य प्रशासन विभाग ( माहिती तंत्रज्ञान ) मंत्रालय , मुंबई विभागाने शासकिय सेवेतील गट- अ , ब , क संवर्गातील पदभरती जाहिरातीमध्ये संगणक अर्हतेबाबत शासन निर्णय व पुरक पत्रांचा संदर्भ देणेबाबत दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ रोजी शासन परिपत्रकान्वये नमुद केलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे मार्फत घेण्यात येणा – या संगणक टंकलेखन परीक्षा गर्व्हनमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपींग कोर्स (GCC -TBC ) इंग्रजी , मराठी , हिंदी ३० , ४० श.प्र.मि. ( जीसीसी – टिबीसी ) उत्तीर्ण प्रमाणपत्र या अभ्यासक्रमास ” संगणक अर्हता ‘ म्हणुन मान्यता देण्यात आली आहे , अशी माहिती महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे यांनी दिली .
यापुढे शासकिय सेवेतील गट अ , ब , क संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असणारी संगणक अर्हता शासन निर्णय व पुरक पत्राव्दारे निश्चित करण्यात आली आहे . यास्तव , संवर्गातील शासकिय पदभरती जाहिरातीमध्ये संदर्भाधीन अनु.क्र . २,३ व ४ येथील शासन निर्णय व पुरक पत्रांचा संदर्भ देणे शासनाच्या सर्व विभाग , कार्यालये , महामंडळे , स्वायत्त संस्था , उपक्रम इ.ना बंधनकारक करण्यात येत आहे , असे आदेशात नमूद केले आहे . महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रिडा विभागाचे नियंत्रित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणेमार्फत ३१ ऑक्टोबर २०१३ अन्वये सुरुझालेला संगणक टंकलोन 1- प्रकाश कराळे जीसीसी – टिबीसी म्हणजेच गर्व्हनमेंट कॉम्प्युटर टायपींग बेसिक कोर्स (GCC -TBC ) इंग्रजी , मराठी , हिंदी ३०,४० श.प्र.मि. ला संगणक अर्हतेचा नोकर भरतीत समावेश होणारा १६ जुलै २०१८ चा शासन आदेशाचा नोकर भरतीच्या जाहिरातीत उल्लेख होणार असल्याने महाराष्ट्र राज्यातील ३५०० शासन मान्य संगणक संस्थामध्ये आनंद निर्माण झाला आहे .
शासकिय सेवेतील पदभरती जाहिरातीमध्ये संदर्भादिन शासन निर्णय व पूरक पत्रांच्या संदर्भ देण्याबाबतची सर्व जबाबदारी संबंधित विभाग , कार्यालय , महामंडळे , स्वायत्त संस्था , उपक्रम इ . असेल तसेच यापुढे वेळोवेळी संगणक अर्हता अभ्यासक्रमामध्ये नवीन अभ्यासक्रमाचा सामावेश करण्याकरीता शासन स्तरावर जे निर्णय निर्गमित करण्यात येतील , त्याचासुध्दा सामावेश शासकिय पदभरती जाहिरातीमध्ये करण्यात यावा .
सदर शासन आदेश परिपत्रक सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या निदर्शणास आणावे , असे शासन आदेशात नमूद केले आहे . या निर्णयाचा सुमारे ६ लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याने महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन शासन मान्य संस्थांच्या संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे , महासचिव हेमंत ढमढेरे , वरिष्ठ उपाध्यक्ष दिनेश पोरे , प्रवक्ते सुभाष पाटील , कोषाध्यक्ष सुभाष बागड , परीक्षा सचिव अभिलाषा नाईक , प्रसिध्दी प्रमुख संतोष झंजाड , सहसचिव अरुण चांडक व कार्यकारणीने सदस्यांनी स्वागत केले आहे .