
मेहकर रवींद्र सुरुशे– मेहकर तालुक्यातील कळपविहीर गावाला लागून असलेल्या नदीवरील पुल दि. १५ जून रोजी झालेल्या अतीवृष्टीमुळे वाहून गेला आहे.त्यामुळे पेरणी चे दिवस असतांना शेतात कसे जायचे हा प्रश्न शेतकऱ्या समोर आ वासून उभा आहे.पुल गेल्या मूळे आता पेरणी कशी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे . मेहकर मतदार संघांचे आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनी त्याचा पाठपुरावा करून पुल मंजूर करण्यात आला होता. परंतु अजून सुद्धा पुलाचे काम झाले नसल्यामुळे याला दोषी कोण? प्रशासन की, गरीब शेतकरी जनता असा प्रश्न शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना पडला आहे.अशी माहीती सामाजीक कार्यकर्ते गणेश तांगडे यांनी दिली आहे. वाहून गेलेल्या पूलाचे काम संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशाराही सुद्धा सामाजिक कार्यकर्ते गणेश तांगडे यांनी दिला आहे.