Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मा.एकनाथराव खडसे यांना ईडी मार्फत नाहक त्रास देत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व निवेदन

NCP

गजानन सोनटक्के जळगाव जा . भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर केंद्रातील भाजपा सरकार विरोधात आवाज उठवल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा ईडीच्या मार्फत एकनाथराव खडसे यांना नाहक त्रास दिल्या जात आहे. नाथाभाऊ यांनी कुठलाही भूखंड विकत घेतलेला नसतांना राजकीय सुडबुद्धिने त्यांच्याविरुद्ध ईडी चा फार्स भाजपा मार्फत केला जात आहे.त्यांना मानसिक त्रास देण्याचे विरोधकांचे छडयंत्र यातून स्पष्ट होते.याआधी विविध पाच सरकारी संस्थामार्फत चौकशी होऊन त्यात निर्दोष असल्याचे निष्पन्न होऊन सुद्धा केवळ राजकीय हेतुने एका ज्येष्ठ ओबीसी नेत्याला त्रास देण्याच पाप भाजपा करू पाहत आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जामोद च्या वतीने जाहिर निषेध करित एकनाथराव खडसे व त्यांच्या कुटुंबाविरुद्ध चालू असलेली चौकशी तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत दाभाड़े,रंगराव देशमुख, संदिप उगले,प्रकाशसेठ ढोकने, एम.डी.साबीर,शेख जावेद,अतुल उमाळे, शहराध्यक्ष अ.जहीर.अ. जब्बार, ईरफान खान, अतुल उमाळे,पराग अवचार, एजाज देशमुख,सिद्धार्थ हेलोडे, धनंजय सारोकार,सचिन ढाके,आशिष वायझोड़े, जय कागदे,अताउल्ला खान,मंगल डोंगरदिवे,सतिश तायड़े,गजानन रोठे, मंगेश देशमुख,मुज़हीर मौलाना यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.