गजानन सोनटक्के जळगाव जामोद – नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेती विषयक विविध योजना कृषी विभागाच्या माध्यमातून पुरविल्या जातात त्यानुसार शासनाच्या आदेशानुसार त्यासाठी गाव स्तरीय 13 सदस्यांचीसमिती गठीत करावयाची असते त्यानुसार जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव कोरोना नियमानुसार येथे 3/ 7/2021 रोजी ऑनलाइन सभा घेऊन गाव स्तरीय समिती गठीत झाली होती ती समिती अनाधिकृत असल्याची तक्रार सुनगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग रामचंद्र गवइ यांनी 14/ 7 /2021 रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे सादर केली आहे तक्रारीनुसार सभेच्या ऑनलाइन सभेला गणपुर्ती ही पूर्ण नव्हती व ज्या लोकांची नावे ऑनलाईन सभेमध्ये ठरविली गेली त्या लोकांची नावे या समितीत घेतलेली नाही व सदर समितीत काही नावे नंतर टाकल्या गेली ऑनलाईन सभेमध्ये जी नावे सुचविल्या गेले त्यावर कृषी सहायक यांनी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही व काही नावे हे अनाधिकृत टाकले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे व सदर समिती ग्राह्य न धरता पुन्हा नव्याने गठीत करावी व ही समिती अनाधिकृत असल्याचा आक्षेप असणारी तक्रार त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे दाखल केली आहे.
Related Posts