महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडुन प्रशांत डिक्कर यांचा सत्कार
गजानन सोनटक्के जळगाव जा : संग्रामपूर जळगाव (जा.) शेगाव तालुक्याला ६४ कोटी ७ लाख २१ हजार रुपये २०२० चा पिक विमा मंजूर करून दिल्याबद्दल बाजार समितीचे सभागृहामधे पार पडलेल्या कार्यक्रमामधे महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार कृष्णराव इंगळे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश पाटील,जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संगितराव भोंगळ, शिवसेना नेते दत्ता पाटील, गजानन वाघ, ॲड संदिप उगले, यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचा सत्कार करण्यात आला.

पुणे मुंबई मधे पिक विमा प्रश्नावर आंदोलन करुण त्या आंदोलनाच्या माध्यमातून कंपनीने ठरवलेल्या ७२ तासांच्या आत तक्रारीच्या निर्णयाला झुगारुन ६४ कोटीचा मंडळनिहाय सरसकट पिक विमा मंजूर करून आणल्याने. प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांनसाठी केलेले काम हे कौतुकास्पद ठरले आहे.
त्या अनुषंगाने आयोजित केलेला छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम पार पडला. या वेळी ॲड भाऊराव भालेराव, तुकाराम काळपांडे, पुंडलिक पाटील, अजाबराव वाघ, विजय काळे, प्रकाश ढोकणे, संजय धुर्डे, मनोहर वाघ, रुपराव पाटील, अविनाश उमरकर, डॉ प्रशांत दाभाडे, संजय पारवे, प्रमोद तित्रे सय्यदभाऊ बाहोद्दीन, वसंतराव धूर्डे,अंनता मानकर, प्रमोद पाटील, रमेश ताडे संजय भुजबळ, अर्जुन घोलप, श्रीकृष्ण केदार,ईश्वर वाघ,अक्षय भालतडक, हुसेण डायमंड यांच्या सह महाविकास आघाडीतिल बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.