देऊळगाव राजा प्रतिनिधी – ०८ जुन २०२१ ला मा.ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या संकल्पनेतून ऑक्सफर्ड इंटरनेशनल स्कुल देऊळगांवराजा येथे सहकार महर्षी भास्कररावजी शिंगणे साहेब मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र देऊळगांवराजा व्दारे मोफत पोलीस भरती ऑनलाईन प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन मा.सौ.अनुजाताई सावळे पाटील यांच्या हस्ते झाले .
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.श्री.बाळाजी भिमाजी गोरे ( से.नि.मुख्याध्यापक ) हे होते . कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ , क्रांतीज्योती सावित्रीबाई , सरस्वती यांच्या प्रतिमेच्या पुजनाने करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली . त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले . प्रस्तावना प्रमोद घोंगे पाटील यांनी करतांना प्रशिक्षणाचे महत्व सांगितले . त्यानंतर संदीप देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले . त्यानंतर नवयुवक डी.एड्.कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष विजय पवार यांनी बोलतांना सांगितले की , हे ऑनलाईन प्रशिक्षण सुरु करण्यासाठी मा.ना.डॉ.राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी मोलाचे सहकार्य मतदार संघातील युवकांसाठी केले .
कार्यक्रमाच्या उद्घाटक सौ.अनुजा सावळे पाटील यांनी बोलतांना सांगितले की , जिल्ह्यामध्ये अतिशय स्तुत्य उपक्रम सुरु करण्यात आला आहे . त्यांनी युवकांना असे आवाहन केले की , आपण या शिबीरांचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा . शिक्षकांना सुध्दा त्यांनी यावेळी आपले चांगली सेवा देऊन हे शिबीर यशस्वी करावे असे सांगितले . कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळाजी गोरे गुरुजी यांनी अंधश्रध्दा निर्मूलन , सत्यशोधाकीय विचार , आधुनिक काळामध्ये पुरोगामी विचारांची आवश्यकता या विषयी माहिती दिली . यावेळी वसीम अहेमद , बालाजी कुलवंत , ढगे सर , सुनिल शिंदे , समाधान सानप सर , सुनिल पवार सर , भिकाजी पाटील बंगाळे ( मा.उपाध्यक्ष वि.वि.का.सोसायटी सिनगांव ) , गजानन बंगाळे हे उपस्थित होते . तरी जिल्ह्यातील युवकांनी ९९ ६०४२५४४४ या मोबाईलवर संपर्क करुन आपली नांवे नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांकडून या वेळी करण्यात आले.