Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मेहकर पोलीस जबाबदार ! आमची जर काही कमी जास्त झाले तर .

मातृतीर्थ लाइव्‍ह न्यूज नेटवर्क – शेतीच्या वादातून पती – पत्नीला जबर मारहाण झाल्याची घटना 6 जूनला नागझरी ( ता . मेहकर ) शिवारात घडली होती . या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे . चुलत भावांनीच भाऊ व भावजयीला मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे . याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी कुणालाही अटक नाही . शिवाय विनयभंग होऊनही केवळ मारहाणीची तक्रार घेतली . आरोपींची संख्या जास्त असली तरी केवळ तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला .

PALGHAR

त्यामुळे राजेंद्र वसंता मगर व गणेश वसंता मगर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मेहकर पोलिसांच्या विरोधात तक्रार केली आहे . आमच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास मेहकर पोलीसच जबाबदार राहतील , असेही तक्रारीत म्हटले आहे . तक्रारीत म्हटले आहे , की 6 जूनला दुपारी एकच्या सुमारास देऊळगाव माळी येथील राजेंद्र वसंता मगर व त्यांची पत्नी अनिता मगर शेतात काम करत होते . त्यावेळी त्यांच्या शेतात चुलत भाऊ बाबुराव किसन मगर याने ट्रॅक्टर घुसवले व नांगरणी करू लागला . तू माझ्या शेतात नांगरणी कशाला करतो . शेताच्या मालकी हक्काचे प्रकरण कोर्टात सुरू आहे . निकाल तुझ्या बाजूने लागला तर शेत तुला सोडून देईन , असे राजेंद्र मगर यांनी म्हटले . तेव्हा ट्रॅक्टरवर बसलेल्या बाबुराव मगर याने याच्या भावांना बोलावून घेतले . बाबुराव मगर , मधुकर मगर , बबन मगर या सर्वांनी मिळून राजेंद्र मगर यांना जबर मारहाण केली . भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या अनिता मगर यांनाही मारहाण करत साडीचा पदर खेचून वाईट उद्देशाने स्पर्श करून विनयभंग केला . मात्र मेहकर पोलिसांनी केवळ मारहाणीची तक्रार घेत विनयभंगाची तक्रार घेतली नाही , असेही तक्रारीत म्हटले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.