रवींद्र सुरूशे मेहकर – मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथे एका टावर संबंधित विद्युत रोहित्रचे काम सुरू होते हे कामकरीत असताना एका व्यक्तीला विजेचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना आज 29 जून रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली मात्रया विद्युत रोहित्रचे कामकरीत असताना वीज वितरण कंपनीकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याने जानेफळ सर्कलचे वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता दिलीप निकम यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला नियमानुसार तक्रार दिली असल्याचे समजते हिवरा खुर्द येथे एका टावर संबंधित विद्युत रोहित्र चे काम सुरू होते विद्युत रोहित्र बसवत असताना वीज वितरण कंपनीकडून कोणतीही परवानगी घेतली नाही काही खाजगी लोक वीज कंपनीला न कळवता परस्पर हे काम करीत होते दरम्यान पोलीस स्टेशनच्या मिळालेल्या माहितीनुसार हिवरा खुर्दयेथे विद्युत रोहित्राचे काम सुरू होते हे काम सुरू होते . रोहित्र बसवताना अचानक इलेक्ट्रिक शॉक लागून दत्तात्रय सुखदेव वाकळे राहणार हिवरा खुर्द वय ४५ याचा मृत्यू झाला यासंदर्भात जानेफळ पोलिसांनी मर्ग १८/२१ दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार राहुलगोंदे यांच्या मार्गदर्शना खाली इरश्याद पटेल हे करीत आहेत.
Related Posts