Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

युवकांनी वाचविले विहिरीत पडलेल्या व गोमातेचे प्राण

गजानन सोनटक्के जळगाव जा – जळगाव जा तालुक्यातील सुनगाव येथील वावडी हर्दो शिवारातील प्रेमसिंग पवार यांच्या शेतात आज बाजूला गाय चरतर असताना बाजूला असलेल्या नव्वद फूट विहिरीमध्ये अचानक पडली व तो आवाज येताच बाजूला काम करीत असलेले ज्ञानेश्वर कपले दगडू धुळे व योगेश मिसाळ हे युवक विहिरीकडे धावले ही एकच गडबड पाहता शेतात काम करीत असलेले आदिवासी बांधव सुद्धा विहिरीकडे धावले व ज्ञानेश्वर कपले आणि योगेश मिसाळ यांनी तात्काळ दोर चराटआणून जीवाची पर्वा न करता विहिरीमध्ये उतरले वीहिरीला 30 ते 35 फूट पाणी होते परंतु वेळीच दक्षता घेतल्याने मातेसमान असलेल्या व गोमातेचे प्राण वाचविण्यात या युवकांना यश आले तरी जीवाची परवा न करता या युवकांनी दक्षता दाखवून या गोमातेचे प्राण वाचविले त्यामुळे सुनगाव परिसरात त्यांचे कौतुक होत आहे


Leave A Reply

Your email address will not be published.