Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

18 जुन 2021 पर्यंत अंतिम मुदत,अर्ज swfs.applications@gmail.com ईमेलवर सादर करावा

बुलडाणा दि.16: परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या राज्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनामार्फत शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परिपूर्ण अर्ज भरून व आवश्यक कागदपत्रांसह 18 जुन 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकृतीसाठी स्कॅन कॉपी swfs.applications@gmail.com या ईमेल आयडीवर सादर करावा. जे विद्यार्थी ई मेल द्वारे अर्ज पाठवतील त्यांनी ई मेल द्वारे पाठविलेल्या अर्जाची हार्ड कॉपी पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, 3, चर्च रोड, पुणे 41100 येथे सादर करावी.

   योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती / नवबौद्ध घटकातील असावा, राज्याचा रहीवासी असावा, पदव्युत्तर अभ्यास क्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असणार आहे. विद्यार्थ्याच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त नसावे. जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये व लंडन स्कुल ऑफ इकॉनिमिक्स मध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांना ही उत्पन्न मर्यादा लागू राहणार नाही. परदेशातील शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या वा प्रवेशित असलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे, मात्र द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना पुर्ण केलेल्या अभ्यासक्रम कालावधीची शिष्यवृत्ती अनुज्ञेय असणार नाही. परदेश शिष्यवृत्ती योजनेतंर्गत दोन वर्ष कालावधीचाच एम.बी.ए अभ्यासक्रम अनुज्ञेय राहणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेत स्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र असणार आहेत. यापूर्वी शासनाकडून परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी योजनेचा लाभ घेतलेला आहे. असे विद्यार्थीदेखील पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. परदेशातील शिक्षणसंस्था ही जागतिक क्रमवारीत 300 च्या आत असावी. अटी व शर्ती या सविस्तर जाहीरातीप्रमाणे व शासन निर्णयाप्रमाणे लागू राहतील.

PRDESH

                          योजनेचा असा मिळणार लाभ – विद्यापीठाने प्रमाणीत केलेल्या शिक्षण शुल्काची पुर्ण रक्कम, तसेच केंद्र शासनाच्या नॅशनल ओव्हरसीज शिष्यवृत्ती योजनेतंर्गत लागू करण्यात आलेले इतर शुल्क, आरोग्य विमा, व्हिसा शुल्क या बाबी परदेश शिष्यवृत्ती धारकासाठी अनुज्ञेय असणार आहेत. विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रासाठी 15,400 युएस डॉलर, तर इंग्लडसाठी 9900 जी बी पौंड इतका अदा करण्यात येतो. विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेणेसाठी आणि अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी कमीत कमी कालावधीचा आणि नजीकच्या मार्गाचा इकॉनॉमी क्लास विमान प्रवास दर दिला जाणार आहे. विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी युएसए व इतर देशासाठी 1500 युएस डॉलर व इंग्लडकरीता 1100 जी.बी पौंड इतकी रक्कम देण्यात येते. यामध्ये पुस्तके, अभ्यास दौरा व इतर खर्चाचा समावेश आहे.

         सध्या कोविड – 19 या सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोणतेही कारण न देता सदर योजनेची प्रक्रिया रद्द करणे, प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलणे यासह योजने / निवड, अंमलबजावणीबाबतचे सर्व अधिकार शासन स्वत:कडे राखून ठेवत आहे. यावर्षी 14 जुन 2021 च्या जाहीरातीचे अनुषंगाने ज्या विद्यार्थ्याने अर्ज केलेले आहेत. त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्जाचा नमुना व अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.