सिंदखेडराजा प्रतिनिधी सचिन मांटे – सिंदखेडराजा तालुक्यातील नागपूर-मुंबई हाय-वेला लागून असलेले किनगाव राजा ते हिवरखेड रस्त्याचा प्रवास हा जीवघेणा झालाआहे.किनगाव राजा येथे कृषी मार्केटसाठी व बैंक कामासाठी शेकडो शेतकऱ्यांना रोज यावे लागते व परिसरातील दहा-बारा खेड्यातील लोकांना दवाखान्यासाठी रात्री-बेरात्री कधीही यावे लागते.
हिवरखेड रस्त्याने नागरिकांना जाता-येतांना खूप मोठ्या समस्याना तोंड दयावे लागत आहे.शेकडो दुचाकी व छोट्या-मोठ्या चारचाकी वाहने आणि समृद्धीची अवजड वाहने रस्त्याने ये जा करत असून दुचाकी सहित सर्वच वाहनधारकाकरिता हा प्रवास जीवघेणा ठरत आहे. किनगाव राजा बसस्थानका पासूनच हिवरखेड पर्यंत जातांना पाच किलोमीटर रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे.असेही म्हणता येईल की खड्यातच रस्ता आहे. रोज कोणीतरी पडून/जखमी होऊन दवाखान्यात आल्याची माहिती किनगाव राजा येथील दवाखान्यात ऐकायला मिळते.किनगाव राजा येथे येण्या साठी या रस्त्याशिवाय दुसरा पर्याय परिसरातील लोकांपुढे नाही.इच्छा नसतांना लोकांना आल्याशिवाय पर्याय नाही…
एकंदर या रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले असून हा रस्ता अपघातचा सापळा तयार झाला आहे.तढेगाव या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या साठी तरी संबधीत विभागाने रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी किनगाव राजा,हिवरखेड व परिसरातील दहा-बारा खेड्यातील नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.