Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

आ. संजय गायकवाड यांचे वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न वाहन पेटवले .

SANJAY GAYAKWAD

बुलढाणा – शिवसेना आमदार संजय गायकवाड़ यांची क्रेटा गाड़ी काल रात्रि 3 वजेदरम्यान जाळण्याचा प्रयत्न झाला.काही दिवसांपासून विविध वक्तव्यांनी महाराष्ट्रभर चर्चेत असणारे बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्याचा स्फोट घडवून त्यांच्या एकूणच घरावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न आज मंगळवार 26 मे रोजी भल्या पहाटे घडला.

आ. संजय गायकवाड मुंबईला गेले होते, तेथून रात्री दीड वाजता ते घरी परत आले. पण त्यांनी प्रवासात फॉर्च्यूनर गाडि वापरली. क्रेटा गाडीला आग लागल्यानंतर गाडीने सायरन वाजविला त्यामुळे आग लागल्याचे लक्षात आले. आवाज होताच गायकवाड कुटुंबिय खाली उतरले. नंतर आग विझविली. सुदैवाने त्याठिकाणी असणाऱ्या इनोवा, फॉर्च्यूनर आणि बुलेटसह इतर 7 ते 8 गाड्या या आगीतून बचावल्या.


3 वाजेच्या सुमारास 2 अज्ञात व्यक्तींनी टू व्हीलरवर येऊन वाहनाची पेट्रोलची टॅंक जिथे असते, त्याठिकाणी पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली त्याच्या पुढे मागे 4 ते 5 गाड्या उभ्या होत्या, एक गाडीत पेटली असता ती सर्व वाहने पेटली जातील व घर क्षतिग्रस्त होऊन गायकवाड परिवाराला इजा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्या गेल्याचा आरोप होत आहे. दरम्यान हा हल्ला करतेवेळी या परिसरातील विद्युत पुरवठाही हल्लेखोरांनी तोडला होता असा कयास व्यक्त होत आहे.
या घटनेच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले , त्यांनी शोध सुरू केला आहे. याप्रकरणी आ. संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला , ही घटना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ही गंभीरतेने घेतली आहे. व पुढील तपस करत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.