Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जवळका येथील महिला सरपंचावर अविश्वास आणणारे उपसरपंच अपात्र

दुसरबीड ता सिंदखेड राजा प्रतिनिधी सचिन मांटे – जऊळका येथील सरपंचावर याच महिण्यात अविश्वास ठराव दाखल करणारे उपसरपंच नामदेव बुधवत यांना आज दि 29 सप्टेंबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये अपात्र केले असून त्यांचे सदस्यत्व आणि उपसरपंच पद रद्द केले आहे .


जऊळका येथील उपसरपंच नामदेव म्हसाजी बुधवत यांनी ग्राम पंचायत निवडणूक लढतांना संडासचे बोगस कागदपत्रे लावून निवडणूक लढविली होती . निवडून आल्यानंतर त्यांनी ई-क्लास जमिनीवर शासणाचा रेडीमेड संडास उभा करुन बनवाबनवी केली आणि शासणाची दिशाभुल केली . अशी तंक्रार विजय नागरे यांनी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे दाखल केली . उपरोक्त प्रकरणी पटवारी , मंडळाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते . त्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला . त्या नुसार तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी उपसरपंच नामदेव म्हसाजी बुधवत यांना अपात्र करण्यात आले होते .

उपसरपंच बुधवत यांनी अपात्र निर्णयाला आवाहन देत उपायुक्त अमरावती यांच्याकडे प्रकरण दाखल करुन स्टे मिळविला होता . ते प्रकरण उपायुक्त अमरावती यांच्याकडे दोन वर्ष चालवून सदर प्रकरण अप्पर जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे पुन्हा फ्रे र चौकशी करून निकाल देण्याचे आदेश दिले . त्यानुसार दोन्हीकडील वकीलांचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर उपसरपंच नामदेव म्हसाजी बुधवत यांनी अतिक्रमण केले असून त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही असा निर्णय आज 29 सप्टेंबर रोजी देत त्याचे सदस्यत्व आणि उपसरपंच पद रद्द केले आहे .


येथील
ग्राम पंचायत महिला सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्यावर उपसरपंच व सदस्य त्यांनी सरपंचावर अविश्वास ठराव पारित केला होता त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी याच महिन्यात दि 2 सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा बोलावली होती त्यामध्ये ग्रामस्थांनी बहुमताने सरपंच हाच पाहिजे हा ठराव मंजूर केल्याने महिला सरपंच सौ सांगळे ह्या पदावर कायम राहिल्या होत्या सदर घटनेची राजकारण शांत होत असतानाच आज उपसरपंच बुधवत हे अपात्र झाल्याचा निकाल अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिला त्यामुळे सदर ग्रामपंचायत ची निवडणूक झाल्या पासून आज पर्यंत गावात विकास कामा ऐवजी आरोप प्रत्यारोप , व एकमेकांचे जिरवा जिरवीत एकमेकांवर अविश्वास ठराव तक्रारी जिल्हाधिकारी आयुक्तालय मंत्रालय उच्च न्यायालय यातच सरपंच आणि उपसरपंच व सदस्य यांची चार वर्ष निघून गेली आहेत . त्यामुळे गावात एक रुपयाचाही विकास कामे झाली नसल्याने गावाचा कोणताही सर्वांगिण विकास झाला नाही असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.