महाबिजणे चिखली तालुक्यातील बिजोत्पादक शेतकर्यासाठी बियाणे कोटा वाढवुन द्यावा.स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांची व्यवस्थापकीय संचालकांकडे मागणी…
चिखली प्रतिनिधी – शेती मशागतीच्या कामास सुरुवात झाली असुन शेतकरी मशागतीच्या कामास लागला व बियाणे, खतासाठी शेतकरी धावपळ करतांना दिसत आहे.शेतकर्यानी महाबिजकडे सोयाबीन बियाणेसाठी नोंदणी केली आहे.मात्र चिखली तालुक्यात मागणीच्या ५०% बियाणेच मिळणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर चिखली तालुक्यातील शेतकर्यासाठी सोयाबीनचे प्रमाणीत बियाणे कोटा वाढवण्यात यावा,अशी मागणी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य तथा स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे ०१जुन २०२१ रोजी केली आहे.

चिखली तालुका हा राज्यात सोयाबीन उत्पादनाच्या क्षेत्रात अग्रेसर असुन चिखली येथे बियाणे प्रकल्प सुद्धा सर्वात मोठा आहे.तालुक्यातील शेतकर्यानी महाबिज केंद्रावर सोयाबीन बियाण्याची यापुर्वीच नोंदणी केली आहे. शेतकर्यानी त्या दृष्ट्टीने पेरणीचे नियोजन सुद्धा केले आहे .परंतु जिल्ह्यात ५४% शेतकर्यानाच महाबिजकडुन बियाणे मिळू शकते असी माहिती असल्याने व चिखली महाबिज केंद्रावर शेतकरी गेले असता तालुक्यासाठी मागणीच्या ५०%च बियाणे मिळेल असे सांगीतले जात आहे पेरणीच्या नियोजनात असलेल्या शेतकर्याना महाबिज कडुन मागणी नुसार बियाणे मिळणार नसल्याने व कृषी केंद्रावरही महाबिजचे प्रमाणीत बियाणे साठा कमी असल्याने शेतकर्यापुढे अचानकच बियाण्याचे संकट उभे राहले आहे. पायाभुत बियाणे शिवाय दुसरे कोणतेही बियाणे पेरणी करता येत नाही.असे असतांना मागणी प्रमाणे बियाणे मिळणार नसल्याने उर्वरीत क्षेत्र पडीत ठेवायचे का ?असे प्रश्न अल्पभुधारक शेतकरी उपस्थीत करीत आहेत .
या चिंतेनेच शेतकरी बियाणेसाठी महाबिज वर गर्दि करीत आहे. तालुक्यात बियाणे कमी प्रमाणात उत्पादन झाल्यास या प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा याचा परीणाम होवु शकतो व भविष्यात यापेक्षा मोठा सोयाबीन बियाणे तुटवडा निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही या समस्येस घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकर्यासाठी सरसावली असुन चिखली तालुक्यातील शेतकर्यासाठी सोयाबीनचे पायाभुत बियाणे कोटा ५०% पेक्षा जास्त वाढवुण देण्यात यावा,महाबिज कडुन प्रमाणीत बियाणे उपलब्ध करुण देण्यात यावे व शेतकर्याच्या समस्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी महाबिजचे व्यवस्थापकीय संचालक,पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे,जिल्हाधिकारी व महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.सदर मागण्यांची पुर्तता न झाल्यास शेतकर्याच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा सज्जड इशारा पत्रात देण्यात आला आहे.
ऐन वेळेवर मागणीच्या 50% येवढे च बियाने देण्याचे महाबिजने जाहीर केल्याने व इतरत्रही बियाणे मिळत नसल्याने शेतकर्यानी या चिंतेपायी चिखली महाबिज केंद्रावर गर्दि केली होती.