प्रतिनिधी मेहकर (रवींद्र सुरुशे ) – ग्रामीण भागातील गोरगरीब रूग्णांना कोवीड काळात अल्पदरात उपचार घेता यावे याकरीता विवेकानंद आश्रमाने विवेकानंद कोविड रूग्णालय सुरू केले. या कोविड रूग्णालयातून अनेक गोरगरीब कोवीड रूग्णांना मोठा आधार मिळाला. विवेकानंद आश्रमाची आरोग्य सेवेची दैदिप्यमान अशी परंपरा आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकापेक्षाही अल्पदरात विवेकानंद कोविड रूग्णालयात कोविड रूग्णांवर उपचार करून रूग्णांना कोरोनामुक्त केल्या जाते. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींच्या कल्पनेतून साकारलेली भव्य इमारत, निसर्गरम्य आणि अध्यात्मिक अधिष्ठान असलेला परीसर, तज्ञ व समर्पित भावनेने काम करणारे डॉक्टर्स यामुळे रूग्ण लवकर बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
विवेकानंद आश्रमाच्या कोवीड रूग्णालयास मदत करावी या उदात्त हेतूने सेंट्रल बँक रिटायर्ड ऑफिसर्स असोशिएशन नागपूर या संघटनेचे महासचिव डी.एस.लहाने यांनी संघटनेतील प्रमुख पदाधिकारी चेअरमन श्री. राजेश लोखंडे, अध्यक्ष श्री. अनंत खोरगडे , वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. रामदास काळे, उपमहासचिव श्री. ऊदय मोहरील, व सल्लागार समितीचे सदश्य सर्वश्री व्ही. जी. घटवई, आबा देशपांडे, सी आर मंगलेकर यांचेशी चर्चा करुन अशा सेवेभावी संस्थेस ५१००० हजार रूपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला. आज डि.एस.लहाने यांच्या वतीने त्यांचे बंधू दत्तात्रय लहाने, अशोक लहाने यांच्या हस्ते विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी यांच्याकडे आश्रमाच्या कोविड रूग्णालयाकरीता ५१ हजाराची देणगी सुपूर्त केली. याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, भूषन लहाने तथा आदि उपस्थित होते.
डी.एस.लहाने हे मुळ हिवरा बु येथील रहिवाशी आहेत. डी.एस.लहाने नोकरीमध्ये असतांना अखंड २१ वर्ष अधिकारी संगठने चे महासचिव म्हणुन नेतृत्व केले. डि.एस.लहाने हे २०१० मध्ये अग्रणी जिल्हा व्यवस्थापक या पदावरुन सेन्ट्रल बॅंक ऑफ इंडिया मधुन सेवानिवृत्त झाले. त्यांनी सेवानिवृत्त अधिकारी संघटनेची २०१२ या वर्षी स्थापना केली, तेव्हापासुन ते महासचिव या पदावर कार्यरत आहेत. डि.एस.लहाने हे अखिल भारतीय स्तरावर सेवानिवृत्त अधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष पदावर निवडुन आले आहेत.
‘प.पू. शुकदास महाराज यांच्या प्रेरणेने व आशिर्वादाने ग्रामीण भागातील गोर गरिबांसाठी आश्रमाने विवेकानंद कोविड रूग्णालय सुरू करून संस्था मोलाची कामगिरी करित आहे. संस्थेच्या कार्यात मदत म्हणून ही देणगी देण्यासाठी २०२१-२२ या वर्षान्तर्गत या संस्थेची पहीली व प्राथमिक निवड सेन्ट्रल बॅंक रिडायर्ड ॲाफीसर्स असोशिएशन, नागपूर या संगठने द्वारा करण्यात आली आहे.’