विधुत वितरण मंडळ शेगाव यांच्या कारवाही बद्दल.स्वाभिमानीचे शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री. टाले साहेब यांना निवेदन
शेगाव – माघील दिड वर्षा पासून कोरोना महामारी मुळे सर्व जणता आर्थिक दृष्ट्या हतबल झाली आहे. कोरोना मुडे सर्व उद्योगधंदे व्यवयाय बंद होते. सत्तच्या पावसाने शेतातिल उत्पन्न बुडाले अशा सर्व संकटाने शेतकरी शेतमजुर व सर्व सामान्य जनता आर्थिक दृष्ट्या खचुन गेलेला आहे. अश्या परिस्तिथी कोरोनाची पहिली लाट गेल्या नंतर दुसऱ्या लाटेसोबत सर्व सामान्य जनता शासनाला ला सहकार्य करीत आहे. आणि आत्ता तिसरी लाट येण्याचे संकेत आहेत. या कोरोनाच्या लाटेमध्ये सामान्य जनता होरपडून निघाली आहे. आर्थिक परिस्थिती मुडे सर्वसामान्य जनता पूर्णतःव हतबल झाली आहे. या अश्या परिस्थितित वीज वितरण कंपनी विभागा मार्फत वीज बिलाची वसुली करण्याकरिता आपल्या पोलीस प्रशासनचे सहकार्य माघितले आहे. महोदय मि आपणास सांगू इच्छितो कि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोरोना काळातील विधुत ग्राहकांचे आवाजावी बिल रिडींग पेक्षा जास्त वीज बिल व सक्तीच्या वसुली विरोधात संविधानिक शांततेच्या मार्गाने अनेक वेळा आंदोलन केले याचे आपण पोलीस विभाग साक्षीदार आहात. या आंदोलनाचा शासना वर्ती कोणताच प्रभाव होताना दिसत नाही.

त्या मुळे कि काय विधुत वितरण कंपनी वीज बिल न भरल्यास वीज जोडणी तोडू अश्या प्रकारे कारवाई करीत आहे. वीज वितरण मंडळाचे वीज ग्राहकांचे वीज जोडणी तोडन काही साध्य होणार नसून मधला मार्ग म्हणून वीज वितरण मंडळ यांनी अगोदर आवाजावी वीज बिला संदर्भात वीज ग्राहकांची अळचन जाणून घ्यावी. तसेच बरेच ग्राहकांना रिडींग पेक्षा जास्त बिल आले आहे.त्या मुडे रिडींग चेक करून विधुत जोडणी न तोडता बिला मध्ये हप्ते पडून देऊन कोरोना मुडे आर्थिक संकटात सापडलेल्या व हातभल झालेल्या विधुत ग्राहकांना दिलासा द्यावा अश्या तऱ्हेचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कडून वीज वितरण मंडळ यांना दिले आहे. ज्या प्रकारे वीज वितरण मंडळ यांनी आपले सहकार्य माघीतले आहे त्याच प्रकारे पोलीस प्रशासना वर्ती वीज ग्राहकांना ही अधिकार असून पोलीस प्रशासनानी परिस्थिती जाणून घेऊन वीज ग्रहकांना देखील सहकार्य करावे ही विनंती.