Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शेळीपालन, कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे 15 ते 19 जुनपर्यंत आयोजन

बुलडाणा दि.10 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एमसीईडी) द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, बुलडाणा यांच्या विद्यमाने व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवतीसाठी बुलडाणा येथे शेळीपालन, कुक्कुट आणि गाय / म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे.  प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 15 ते 19 जून  2021 कालावधीत 5 दिवस दररोज 4 तासादरम्यान केले आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू करावा हा आहे.

sheli mendhi palan

  सदर प्रशिक्षण कार्यक्रमात शेळी, कुक्कुट व गाय / म्हैस पालनाचे तंत्र, प्रकार त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार, उद्योग सुरू करण्यासठी संपूर्ण सहकार्य, उद्योजकता विकास, उद्योग संधी मार्गदर्शन,   शासकीय योजनांची माहिती आदी प्रशिक्षणात मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे.  प्रशिक्षणात प्रवेश घेवू इच्छिणारा उमेदवार हा किमान 5 वी पास, वय 18 ते 50 वर्ष असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. तरी प्रशिक्षण नोंदणीसाठी 15 जुन 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, MCED, दुरदर्शन केंद्रासमोर, मलकापूर रोड, बुलडाणा यांच्या 8275093201 मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन विभागीय अधिकारी योगेश डफाडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.