Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सुनगाव येथील विद्युत पोल ठरतोय जीवघेणा

POLL

गजानन सोनटक्के जळगाव जा – जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील स्थानिक बजरंग चौकातील विद्युत वितरण कंपनीचा पोल ठरतोय जीवघेणा स्थानिक बजरंग चौक येथील विद्युत वितरण कंपनीचा विद्यूत पोल हा बऱ्याच वर्षांपासून चा जुना आहे व त्यावर बऱ्याच विद्युत तारा आहेत हे पोल जमिनिजवळ सडलेल्या मोडक्या स्थितीत आहे व त्याचा ताण असलेला सपोर्ट हा पूर्णपणे तुटलेला आहे 15 ते 20 दिवसांअगोदार कर्मचाऱ्यांनी पोलाला बाजूस असलेल्या झाडाला बांधून ठेवला आहे सदर पोल हा वर्दळीच्या जागी चौकात असून नेहमीच या पोल खालून नागरिकांची व वाहनांची ये जा चालू असते एन पावसाळ्याच्या दिवसात हवा पाऊस सुटताना हा पोल पडतो की काय अशा परिस्थितीत आहे व पोल दुर्दैवाने पडला तर नक्की जीव घेणे घटना येथे घडणार आहे परंतु विद्युत वितरण कंपनी यांनी याकडे लक्ष द्यायला हवे जेणेकरून जीवघेणा प्रसंग टळेल व लवकरात लवकर या पोलच्या जागी नवीन पोल बसवून हा जीवघेणा प्रसंग टाळावा असे येथील स्थानिक बजरंग चौक येथील नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.